Mantarlele Pani | मंतरलेले पाणी Author: Arvind Hasamnis |अरविंद हसमनीस
Regular price
Rs. 79.00
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 79.00
Unit price
per
शब्दकोश घेऊन कवितेचा अर्थ लागत नसतो. कविता ही साक्षात अनुभवयाची बाब आहे. ‘अनुभव’ हाच तिचा अर्थ असतो; हे मी प्रामुख्याने ‘तरल’ कवितांबाबत म्हणतो. तरलतेची व्याख्या नसते; तर केवळ तरल-अनुभव असतो. ‘मंतरलेल्या पाण्या’तील कवितांमध्ये असा तरलपणा आहे. सर्वसाधारण कवी जे चंद्र, तारका, फुले इ.चे वर्णन करतात ते पदार्थ विश्वाचे उगा उगा केलेले कवितक असते. पण ‘काळजास कावळा भिडला’, ‘तिचा चंद्र घेऊनि मी चाललो’ इत्यादी जेव्हा कवीच्या आणि रसिकांच्या मनात अवतरते तेव्हा कविता पदार्थविश्व ओलांडून जाते. म्हणून तर अरविंद हसमनीसांच्या कविता अनुभवायच्या!