Mansanchya Goshti by Dr Chhaya Mahajan माणसांच्या गोष्टी डॉ. छाया महाजन
माणसांच्या गोष्टी
आपल्या अवतीभवती अनेक अनेक ढंगांची, अनेक वृत्ती-प्रवृत्तींची माणसं वावरत असतात. आयुष्याच्या लढाईत आपापल्या परीने सामोरे जाणारे हे चेहेरे, काही हरून गेलेले, काही पिचलेले, काही उमदे, काही नियतीशी तडजोड करणारे, तर काही लढायला उभे ठाकलेले… असे विविध चेहेरे या कथासंग्रहात आपल्याला भेटत राहतात.
डॉ. छाया महाजन यांनी हे चेहरे विविध प्रसंगांतून, निवेदनातून आणि पात्रांमधून साकारले आहेत. रजनी, आसावरी, अमांडा, वसुधा, वच्छी अशा व्यक्तिरेखांमधून मानवी स्वभावाचे कंगोरे, त्याची जीवनावरची आसक्ती आणि नात्यांच्या गहियऱ्या छटा या कथासंग्रहात लेखिका सशक्तपणे रेखाटते.
मानवी नात्यांची वीण उलगडून दाखवणाऱ्या पंधरा कथा… माणसांच्या गोष्टी.