Manovikarancha Magova मनोविकारांचा मागोवा By Shrikant Joshi डॉ. श्रीकांत जोशी
Manovikarancha Magova मनोविकारांचा मागोवा By Shrikant Joshi डॉ. श्रीकांत जोशी
मन म्हणजे माणूस,
माझे विचार, माझ्या कल्पना, माझ्या भावना, माझी सुखदुःखे, माझे मन, म्हणजेच मी.
हे माझे मन, माझ्या उज्ज्वल भवितव्यासाठी, उत्तरोत्तर प्रगतीसाठी, मला सुदृढ राखायला हवे.
म्हणूनच, मनाच्या आरोग्याचे शत्रू असणार्या चिंता, भीती, संशय, नैराश्य, क्रोध आणि अशा इतर अनेक मनोविकारांना वेळेवरच ओळखायला हवं, शमवायला हवं.
मनोविकारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत जोशी यांचे `मनोविकारांचा मागोवा’ हे पुस्तक आपणांस ज्ञात आणि अज्ञात असलेल्या मनोविकारांवर मात करण्याचे मार्ग दाखवून देत आहे.
दैनंदिन जीवनातील ताणतणाव, आयुष्यामधील उलथापालथी याही आपले मनःस्वास्थ्य हिरावून घेत असतात.
कौटुंबिक कलह, कामजीवनामधील कोलाहल, प्रेमामधील पेच, शिक्षणातील शीण, पिढी-पिढीतले संघर्ष, वैवाहिक विसंवाद, यांसारख्या संपूर्ण कुटुंबाला मनस्ताप घडवणार्या समस्यांवरही डॉ. श्रीकांत जोशी आपल्याशी संवाद साधत आहेत.
निरोगी मनाचा मित्र आणि मार्गदर्शक `मनोविकारांचा मागोवा’ आपल्या मनासाठी, आपल्यासाठीच.