Manjarachi Savali By Jayashree Kulkarni
Regular price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 162.00
Unit price
per
नेमाड्यांच्या पाठोपाठ मनोज सुधीराच्या खोलीत गेला. सुधीरा कॉटवर बसली होती. मनोज आणि नेमाडे खोलीत शिरताच तिने मान वळवून त्यांच्याकडे पाहिले आणि मनोजच्या जीवाचा थरकाप झाला. सुधीराच्या डोळ्यात ओळखीचे भाव किंचितही दिसत नव्हते. तिच्या डोळ्यांत हिरवट झाक आली होती आणि पापण्या पूर्णपणे पांढऱ्या झाल्या होत्या. अंगावरही बुरशीसारखी पांढरट लव दिसत होती. तिचे शरीर तर कमालीचे कृश झाले होते. अवाक् होऊन तिच्याकडे पाहता पाहताच त्याचे लक्ष भिंतीवर पडलेल्या तिच्या सावलीकडे गेले आणि तो पुन्हा एकदा विलक्षण दचकला. भिंतीवर पडलेली सावली एका मांजराची होती. दोन पाय पुढे ठेवून मागचे पाय दुमडून कॉटवर बसलेले एक मांजर त्या सावलीत स्पष्ट दिसत होते. या कथासंठाहातील प्रत्येक कथेतला थरार आणि भयनाट्य काळजाचा ठोका चुकवणारे आहे. अतिंद्रिय, अनाकलनीय प्रसंगाच्या रोमांचकारी घटना जेव्हा आपल्यासमोर साकार होऊ लागतात तेव्हा त्या त्या व्यक्तींच्या मनातील ताणाचे आणि भयाचे प्रक्षेप आपल्याही मनावर येऊन आदळतात. शब्दाशब्दांतून अघोरी वासनांच्या क्रौर्याची धग आपल्यापर्यंत पोहोचून आपल्या अंतर्मनाला अस्वस्थ, घामाघूम करते. ...आणि मग या शब्दभ्रमाच्या मायाजालातून वेगळे होऊन आपण जेव्हा पुन्हा आपल्या नित्याच्या वास्तव जगात परत येतो, तेव्हा आपल्याच सावलीकडे पाहतानाही आपल्याला क्षणभर विलक्षण भीती वाटते.