Payal Books
Mani 'Manasi' | मनी ‘मानसी’ Author: Urmila Rajendra Agarkar | ऊर्मिला राजेंद्र आगरकर
Couldn't load pickup availability
जन्मत:च कर्णबधिर असलेल्या मुलीचे जीवन बदलायला निघालेल्या आईचे आणि त्याबरोबरच तिच्या मुलीचे घडणे ह्या समांतर गोष्टींचा अनुभव एकाच वेळी वाचक घेतो.
आईची प्रतिज्ञा, तिचा अहर्निश संघर्ष, पराभवाच्या अनेक शक्यतांतून तिने काढलेला मार्ग हे सगळे वाचताना
आपण केवळ थक्कच होत नाही, तर हा मार्ग
इतरांना मार्गदर्शक ठरेल, याची खात्री पटते.
हे समांतर अनुभव एक झालेले दिसतात, तिथे ही कथा थांबते. एकाच वेळी आई आणि मुलगी ह्या दुर्दैवी खेळात जिंकतात तेव्हा दोघींनाही मनापासून दाद द्यावीशी वाटते.
तरीही एवढीच ह्या पुस्तकाची मर्यादा नाही.
भाषाविज्ञान, ध्वनिसिद्धान्त आणि विशेष मुलांचे भावविश्व समजून घेऊन उत्तम, आदर्श पालक व शिक्षक कसे व्हावे,
याचा वस्तुपाठ घालून देणारे हे पुस्तक आहे. केवळ ह्यासाठी आपण हे सांगत आहोत, ही लेखिकेची भूमिका नाहीच तर तिच्या धडपडीची, प्रेमाची आणि त्यागाची ही कथा आहे.
दुर्दैवावर अंधश्रद्धेने नव्हे तर प्रयत्नाने मात करता येते याचा सकारात्मक संदेशही येथे मिळतो.
आयुष्यभर आपल्या मनी फक्त मानसीला ठेवणार्या आईचे
हे कथन आपल्याही मनी कायम रेंगाळत राहील, हे मात्र नक्की.
मनी
Information
