Skip to product information
1 of 2

Payal Books

Manasachya Aihik Sukhachi Gosht माणसाच्या ऐहिक सुखाची गोष्ट by लिओ ह्युबरमान कांचन निजसुरे , रमेश पाध्ये

Regular price Rs. 179.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 179.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Manasachya Aihik Sukhachi Gosht माणसाच्या ऐहिक सुखाची गोष्ट by  लिओ ह्युबरमान  कांचन निजसुरे , रमेश पाध्ये 

( Man’s Worldly Goods या पुस्तकाचा मराठी अनुवाद )

स्वतःचं जीवन अधिकाधिक सुसह्य आणि समृद्ध करण्यासाठी गेली हजारो वर्षे मानवसमाजाची सतत धडपड चालू आहे. उपभोगाच्या नवनवीन वस्तूंची निर्मिती करण्यासाठी नैसर्गिक शक्ती आणि संपत्ती यांचा वापर करून पशुमात्रांच्या जोडीने अनेक माणसांनाही काही माणसांनी दावणीला बांधलं. यामुळे काही मूठभर माणसांच्या सुखचैनीसाठी अनेक माणसांनी काबाडकष्ट करण्याची पद्धत रूढ झाली. युरोपात तिसऱ्या-चौथ्या शतकात गुलामांनी बंडाचं निशाण रोवलं आणि रोमन साम्राज्याचा अंत झाला. सतराव्या अठराव्या शतकात भांडवलशाही क्रांतीने सरंजामशाही धुळीस मिळवली आणि औद्योगिक क्रांतीचा मार्ग मोकळा केला. युरोपमधील सरंजामशाहीपासून सुरूवात करून जगभर पसरलेल्या भांडवलशाहीचा उदय, विकास आणि संकटकाळ यांची गोष्ट १९३७ साली लिओ ह्यूबरमान यांनी “मॅन्स् वर्ल्डली गुड्स्” या पुस्तकात अत्यंत सोप्या भाषेत सांगितली. त्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाची ही नवी आवृत्ती.

आज एकविसाव्या शतकात या गोष्टीचं प्रयोजन काय? जागतिकीकरण आणि इंटरनेट यांच्या युगात अशा ‘पुराणकथा’ वाचून काय मिळणार? आपल्याला आवडो किंवा न आवडो, पण या ‘पुराणकथे’तील पात्रं अजूनही जागतिक रंगमंचावर अनेक नाट्यपूर्ण आविष्कार करत आहेत. या परिस्थितीत भांडवलशाहीच्या ऐतिहासिक वाटचालीचा मागोवा घेणारे हे पुस्तक मराठी वाचकांना, विशेषतः तरुण वाचकांना उपयुक्त वाटावे.