Payal Books

Manasa Jivhalyachi | माणसं जिव्हाळ्याची By Sudheer Rasal

Regular price Rs. 222.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 222.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Pulications

माणूस जन्माला येतानाच काही नातीगोती घेऊन येतो. पुढे मग काही गावे आणि काही माणसे त्या गोतात सामील होतात. त्यांचेही मग त्याच्यावर संस्कार होऊ लागतात. त्या गावांच्या आणि त्या माणसांच्या सोबतीनेच तो वाढत जातो. त्याचे जीवन हे खऱ्या अर्थाने त्याचे स्वतंत्र राहतच नाही. या सगळ्यांच्या हातभाराने त्याचे जीवन फुलत राहते. आपले मूळ कोणते आहे आणि आपल्याला इतरांनी काय दिले आहे, याचा हिशोब मांडणे अवघड असते. सुधीर रसाळांनी समीक्षकदृष्टीच्या नेमकेपणाने अशा काही गावांबद्दल आणि माणसांबद्दल लिहिले आहे, अर्थातच त्याबरोबर स्वत:बद्दलही. रसाळांना जशी माणसे आठवतात, गावे आठवतात; तसा तो काळही आणि त्यावेळची संस्कृतीही आठवते. ही व्यक्तिचित्रे जशी काही गावांची आणि काही माणसांची आहेत, तशीच ती एका मावळलेल्या संस्कृतीचीही आहेत. नरेन्द्र चपळगावकर