Skip to product information
1 of 2

Payal Books

Man, Interrupted By James Bailey Translated By Vidula Tokekar

Regular price Rs. 162.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 162.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
यथार्थ स्मृतिचित्रे – डेली टेलिग्राफ तुमचं हृदय काम करत असेल आणि तुम्ही हसू शकत असाल, तर हे पुस्तक घरी न्या. तुम्हाला ते आपलंसं वाटेल – ब्रायन रेली. चित्रपट निर्माता. जेम्सच्या भावनिक प्रवासाचे फार गंभीर आणि गमतीदार चित्रण... क्याचर इन द राय आणि वन फ्लू ओव्हर द ककूज नेस्ट यांच्या मधली ही गोष्ट आहे – विचित्र विलक्षण जेम्स बेली हा विचित्र आणि खचवून टाकणा-या ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी) ने ग्रासला होता. मनावर परिणाम करणारी औषधं आपल्या शरीरात जातील आणि आपल्या मनावर ताबा मिळवतील, या भीतीने तो पछाडला होता. भीतिदायक प्रश्नांनी नेहमी त्याच्यावर पगडा बसवलेला असायचा. लोक त्याच्या अन्नात काहीतरी मिसळतील का? मारिजुआनाच्या पानांच्या फोटोला हात लावला तर नशा चढेल का? अमेरिकेतील एका विशेष रुग्णालयात, त्याच्यावरच्या उपचार कार्यक्रमामध्ये तो आपल्या सर्व भयानक दु:स्वप्नांना सामोरा गेला. त्याने स्थानिक भणंगांमध्ये मिसळावं, त्यांच्याशी हात मिळवावेत आणि त्यांनी जे काय घेतलं आहे ते त्यांच्या आणि आपल्या त्वचेमार्फत आपल्या शरीरात जाईल, या भीतीवर मात करावी; असं त्याला सांगण्यात आलं होतं. हात धुण्याची प्रबळ इच्छा तो जेवढी पुढे ढकलू शकेल, तेवढा तो सुधारेल. हे कथन म्हणजे बेलीच्या अजिंक्य चैतन्याचा आविष्कार आहे, की जो, स्वत: ज्या अतक्र्य प्रसंगांत होता, त्यातली विसंगती आता सांगू शकत आहे आणि ही मिश्कील विनोदबुद्धी आणि त्याच्या जोडीला असलेली चारित्र्यातली शक्ती यामुळेच त्याला बरं व्हायला आणि परत येऊन जगाला सामोरं जायला बळ मिळालं आहे. ‘मॅन, इंटरप्टेड’ हे आपल्याला माणसाच्या दिवसेंदिवस अधिकच दृष्टीस पडणाNया, पिळवटून टाकणा-या एका जगाची ओळख करून देतं. पण हा एक मानसिक आजाराचा नीरस वृत्तान्त राहत नाही; तर एक अत्यंत खुलं, प्रचंड करमणूक करणारं आणि अतिशय समाधान देणारं रंजक कथन होऊन जातं.