Malangatha By Indira Sant
Regular price
Rs. 252.00
Regular price
Rs. 280.00
Sale price
Rs. 252.00
Unit price
per
पहाटेची वेळ. एक डोंगरदरीत विसावलेले एक खेडेगाव. सर्व घरे साखरझोपेत असलेली. पण घरातील ओसरीशी वा पडवीशी एक ठानवई मिणिमीणी उजळत असलेली. त्या प्रकाशात जात्याशी बसलेली एक मालन. एका मांडी घालून, एक पाय लांब सोडलेला. तिचा काकणांनी भरलेला हात जात्याचा खुंटा धरून जाते फिरवीत असलेला. दुसरा हात मधूनमधून बाजूच्या सुपातील जोंधळे मुठीने घेऊन जात्याला भरवीत असलेला. जात्याचा तो मंद सुरातील घर घर असा वळणे घेणारा आवाज. दळतानाच्या हालचालींची माळणीची वळणदार लय आणि यात एकरूप झालेली ती मालन. जसे पीठ जात्यातून झरत जाते, तशा तिच्या ओठातून शब्दकळ्या उमलू लागतात.