Payal Books
Mala Umjalele J. Krushnamurti |मला उमजलेले जे . कृष्णमूर्ती Author: Hemkiran Patki | हेमकिरण पत्की
Couldn't load pickup availability
जे. कृष्णमूर्ती यांचे संपूर्ण जीवन व शिक्षण यांनी २० व्या शतकाचा फार मोठा कालावधी व्यापला आहे. आधुनिक काळातील मानवी जाणिवेवर जे. कृष्णमूर्तींचा सर्वाधिक सखोल प्रभाव असल्याचे अनेकांचे मत आहे.
ऋषी, तत्त्वज्ञ, विचारवंत असलेल्या जे. कृष्णमूर्तींनी जगभरातल्या लाखो माणसांचे जीवन उजळले. जगभरच्या या लाखो माणसांत बुद्धिवंत तसेच सर्वसामान्य, तरुण आणि वृद्ध अशा सर्व वयोगटातील लोक आहेत. ते समकालीन समाजाच्या समस्यांना धाडसाने भिडत आणि माणसाचा मनोव्यापार शास्त्रशुद्ध पद्धतीने व नेमकेपणाने उलगडून दाखवत.
धर्माचा आशय आणि अर्थाला नवे आयाम बहाल करून जे. कृष्णमूर्ती यांनी संघटित धर्मांना पार करणाऱ्या जीवनपद्धतीची दिशा दाखविली.
या प्रवासात संपूर्णपणे बिनशर्त मुक्त मानवाच्या निर्मितीचा त्यांनी उद्घोष केला. खोलवर रुजलेल्या स्वार्थीपणातून आणि दुःखातून मुक्त असा मानव निर्माण करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले.
