Makadmeva By D M Mirasdar
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
per
महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात जसे एक मारुतीचे देऊळ असते, एक पार असतो, एक ओढा असतो, त्या मातीत पिकणारे खास पीक असते तसा गावरान विनोदही असतो. गावओढ्यासारखाच तो सतत खळाळत असतो आणि हरेक पाण्याची चव, तशी या विनोदाची चवही वेगळी असते, खास असते. भंपक माणसांनी मारलेल्या बढायांतून, अडाण्यांच्या आणि अस्त्रापांच्या सहज वागण्यातून, बेरकी लोकांच्या गप्पांतून, जुन्या माणसांच्या आठवणीतून, तरण्यांच्या हुंदडण्यातून विनोद उसळ्या घेत असतो. रोज हसावे असे काही घडत असते. हरबयाची आंब, रात्री कोवळ्या पिकावर फडके पसरून सकाळी धरता येते, पण पाणी दिलेल्या, कणसं, लोंब्या धरलेल्या उभ्या पिकांचा वास धरणे कठीण. मिरासदारांची शहाम्मत अशी की त्यांनी हा विनोद धरला आणि तोसुद्धा त्याच्या खास चवीसकट.