Majhi Sansadetil Bhashane माझी संसदेतील भाषणे by Bhalchandra Munagekar डॉ. भालचंद्र मुणगेकर
Majhi Sansadetil Bhashane माझी संसदेतील भाषणे by Bhalchandra Munagekar डॉ. भालचंद्र मुणगेकर
डॉ. भालचंद्र मुणगेकर हे भारतातील एक आघाडीचे विकासात्मक अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजचिंतक आहेत. त्यांनी सातत्याने वंचित आणि उपेक्षित समाज-घटकांच्या भल्यासाठी सदैव आवाज उठवलेला आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठात अर्थशास्त्र या विषयात एम. ए. आणि पीएच. डी. पदव्या प्राप्त केल्या असून मुंबई विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून १६ वर्षे अध्यापन केले आहे. तसेच, २००० ते २००४ या काळात ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. डॉ. मुणगेकर २०१० ते २०१६ या कालावधीसाठी राष्ट्रपती-नामनिर्देशित राज्यसभा सदस्य होते. त्यापूर्वी त्यांनी नियोजन आयोगाचे सदस्य (२००४-०९) म्हणूनही कार्य केले. तसेच, २००५ ते २०११ या दरम्यान ते शिमला येथील विख्यात ‘भारतीय उच्च अध्ययन संस्थे’चे अध्यक्ष होते. भारताच्या ‘कृषी खर्च आणि मूल्य आयोगा’चे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले. डॉ. मुणगेकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक / सामाजिक, आर्थिक आणि राजकीय तत्त्वज्ञानावरील आघाडीचे भाष्यकार मानले जातात. त्यांनी आतापर्यंत बारा ग्रंथ लिहिले/ संपादित केले असून महत्त्वाच्या आर्थिक व वैचारिक / सामाजिक प्रश्नावर इंग्रजी / मराठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी वैचारिक / सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नांवरील परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी आतापर्यंत सतरा देशांना भेटी दिल्या आहेत. डॉ. आंबेडकरांच्या समग्र लिखाणाचा अभ्यास करून त्यांनी लिहिलेल्या ‘द इसेंशिअल आंबेडकर’ या पहिल्या ग्रंथाची जागतिक पातळीवर प्रशंसा झाली आहे. साहित्य अकादमीने ‘मी असा घडलो’ या त्यांच्या आत्मचरित्राचा ‘अ मॉडर्न इंडियन क्लासिक’ असा गौरव केला आहे.