PAYAL BOOKS
Majhe Jeevan Majha Sangharsh माझे जीवन माझा संघर्ष
Couldn't load pickup availability
Majhe Jeevan Majha Sangharsh माझे जीवन माझा संघर्ष
खान अब्दुल गफारखान (1890-1988) यांना बाच्छा खान, बादशाहाखान आणि फक्र ए अफगाण अशा पदव्या लोकांनी प्रेमाने दिल्या होत्या. भारतात ते ‘सरहद्द गांधी‘ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म ब्रिटिश हुकमतीखालच्या वायव्य सरहद्द प्रांतातल्या उथ्मानझाई येथे झाला. पश्तुन (पख्तुन) लोकांत सामाजिक सुधारणा व्हाव्यात, यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. आजही जगभरातले पश्तुन लोक त्यांच्याप्रति भक्तिभाव बाळगतात. त्यांचे महात्मा गांधींशी खूप आपुलकीचे संबंध होते, तसंच ते खुदाई खिदमतगार (देवाचे सेवक) या संघटनेच्या नेतेपदी ते 1930 ते 1947 एवढा काळ होते म्हणूनही भारतातले लोक त्यांना ओळखतात. खुदाई खिदमतगार संघटनेने केलेल्या अहिंसक चळवळीएवढी यशस्वी आणि दीर्घकाळ चाललेली अहिंसक चळवळ जगात अन्यत्र कुठेही झालेली नाही. वसाहतवादी सरकारने अतिशय निष्ठुरपणे विरोध करूनही खुदाई खिदमतगार किंवा रेड शर्ट्स या नावाने ओळखली जाणारी ही संघटना स्वातंत्र्यसंग्रामात काँग्रेसची अतिशय महत्त्वाची साथी होती. त्यांनी वायव्य सरहद्द प्रांतात एकूण तीन वेळा सरकार स्थापन केले. बादशाहाखानांनी मुस्लीम आणि पश्तुन अशा दोन्ही पार्श्वभूमीवर एक शिस्तबद्ध आणि अहिंसक चळवळ यशस्वीपणे निर्माण केली. न्याय, धाडस, स्त्रियांप्रति आदर आणि सर्वसमावेशकता यांवर त्यांचा भर होता. आजही त्यातून लोकांना प्रेरणा मिळत आहे.
