Payal Books
Majhe Barc Che Divas By Suresh Havare माझे ‘बीएआरसी’ चे दिवस सुरेश हावरे
Couldn't load pickup availability
Majhe Barc Che Divas By Suresh Havare माझे ‘बीएआरसी’ चे दिवस सुरेश हावरे
माझे ‘बीएआरसी’ चे दिवस
‘भाभा अणुसंशोधन केंद्रातील माझे सहकारी डॉ. सुरेश हावरे यांची अणुऊर्जेच्या क्षेत्रात थर्मल हायड्रॉलिक्स, कंटेनमेट बिल्डिंग व त्यातील एनर्जी मॅनेजमेंट संबंधीच्या संशोधनात प्रमुख भूमिका होती. त्यांनी व्यापक प्रमाणावर असंख्य प्रयोग करून कंटेनमेंट मॉडेल विकसित केलं. जे त्यातील सिस्टिमचं विश्लेषण करू शकेल.
आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घटना त्यांच्या जीवनात घडल्या. पण तरीही उद्योग-व्यवसायातही यशस्वी होऊन त्यांनी सन्मानाचं स्थान प्राप्त केलं आहे.
डॉ. अनिल काकोडकर
ज्येष्ठ अणुवैज्ञानिक माजी अध्यक्ष, अणुऊर्जा आयोग ‘भारत सरकार
‘एस.के. मेहता यांच्या विभागात आम्ही १२ तरुण एकाच वेळी रुजू झालो, तेव्हाचा सळसळता उत्साह मला आजही आठवतोय. हावरे अतिशय उत्साही होते आणि वेगवेगळ्या गटांत सहजतेने समन्वय साधू शकायचे.’
कमलेश एन. व्यास
अध्यक्ष, अणुऊर्जा आयोग आणि सचिव, अणुऊर्जा खातं, भारत सरकार
एका साध्या खेड्यातून आलेला मुलगा आपल्या हुशारीच्या, जिद्दीच्या आणि कष्टांच्या बळावर भारतातल्या प्रमुख संशोधन संस्थेत, ‘भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये (बीएआरसी) वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ होतो; त्याचा थक्क करणारा आणि प्रेरक प्रवास म्हणजे हे पुस्तक.
या पुस्तकातून डॉ. हावरे यांचा अडचणींकडे आव्हान म्हणून पाहण्याचा, त्यांचं संधींमध्ये रूपांतर करण्याचा दृष्टिकोन विशेषत्वाने दिसून येतो. तसंच ज्ञान आणि संशोधन यांबद्दल त्यांना असलेली उत्कट आवड पदोपदी व्यक्त होते. आणीबाणीचा काळ, शैक्षणिक संस्थांमध्ये व्यतित केलेले दिवस, बीएआरसीमधलं कार्य आणि पहिल्या भारतीय आण्विक पाणबुडीकरता केलेलं संशोधन व काम, तसंच हिमालयातला प्रवास यांसारख्या कितीतरी गोष्टी ते वाचकांना कथन करतात. त्यातून त्यांची जीवनाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी दिसून येते.
