Skip to product information
1 of 2

Payal Books

mahavidhyalay karyalin kamkaj महाविद्यालय कार्यालयीन कामकाज by W.M. SHEVALE

Regular price Rs. 498.00
Regular price Rs. 550.00 Sale price Rs. 498.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

स्वातंत्र्यानंतर उच्च शिक्षणासाठी प्रगत राष्ट्रांप्रमाणे भारताचा विकास साधावयाचा असेल तर, उच्च शिक्षण घेणार्‍या व्यक्तींचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे, यासाठी गेल्या ६० वर्षात भारतातील विद्यापीठे व महाविद्यालय यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे, सदरकामी केंद्र व राज्य शासनाची पूरक धोरणे विचारात घेता, महाविद्यालयांची संख्या वाढ होत आहे. त्याचबरोबर विद्यापीठ व महाविद्यालय यांच्या दर्जा निश्‍चितीसाठी स्वतंत्र यंत्रणा राबविण्यात येत आहेत. यामुळे महाविद्यालय चालविणारे संस्थाचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, सेवक व विद्यार्थी यांना शासन नियमांची व महाविद्यालय कार्यालयीन कार्यपद्धतीची माहिती असणे अत्यंत गरजेचे झालेले आहे.

संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, सेवक व विद्यार्थी यांना महाविद्यालय कार्यालयीन कामकाजाच्या पूर्ततेसाठी त्याचे मार्गदर्शक स्वरूप माहिती असणे यासाठी सदर ग्रंथाचे महत्त्व हे एका शिक्षकेतर सेवकाने त्यांच्या ३९ वर्षाच्या कार्यालयीन कामकाजाच्या अनुभव संपन्नतेमधून विद्यापीठ आर्थिक व्यवहार, कार्यालयीन रेकॉर्ड, शासन आदेश, नॅक मूल्यांकन, माहिती अधिकार या सर्व बाबींचा समावेश केल्याने अनन्यसाधारण असे आहे.

महाविद्यालय कार्यालयीन कामकाज नियोजनपूर्वक व बिनचूक होऊन कार्यक्षमतेमध्ये गुणात्मक वाढ होण्यासाठी सर्व शिक्षकेतर सेवक यांना हा ग्रंथ मार्गदर्शक आहे