Payal Books
Mahatamachya Pratiksheth By Saroj Deshpande
Couldn't load pickup availability
‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘गाइड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाइड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.
अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.
व्यवसायाने शिक्षक असणार्या एका शिक्षकाची आणि त्याच्या पत्नीची ही खूप सुंदर व गूढगम्य प्रेमकथा आहे. हलक्याफुलक्या आणि विनोदी शैलीत कथेची सुरुवात होते आणि अचानक कथेमध्ये एक अनपेक्षित वळण येते. ‘मृत्यू’ या संकल्पनेचा काहीशा विनोदी पद्धतीने आणि त्याचवेळी प्रगल्भपणे विचार करायला लावणारे अनेक किस्से लेखकाने या पुस्तकात रेखाटले आहेत. पत्नी-पत्नीमधील प्रेमळ सहजीवन, या नात्यामधील नाजूक गुंतागुंत आणि मृत्यू-जीवन यामधील सीमारेषा गडद करणारा शेवट वाचकांच्या हृदयाचा ठाव घेईल…
