maharashtril sant kaviyatri महाराष्टातील संत कवयित्री by Arti Datar
अगणित गुणांचा संगम करून विधात्यानं स्त्रीमूर्ती घडवली. स्त्रीपणात सृजनाच्या नवनवीन दिशा आहेत. वेदकाळापासून संतकाळापर्यंत स्त्रीजीवनाचा आढावा घेतला तर लक्षणीय चढ-उतार दिसतात. वेदकालीन स्त्री स्वयंप्रकाशित होती तर - पुढील काळात स्त्रीचा दर्जा खालावला. स्त्रियांना भक्तीचं स्वातंत्र्य देऊन संतांनी स्त्रीला प्रकाशाची, विकासाची वाट दाखवली. त्यांना सुखदु:खाकडे बघण्याची डोळस वैचारिक दृष्टी दिली.
स्त्रीजीवनाचा हा अर्थपूर्ण सूर दाखवणार्या महाराष्ट्रातील संतस्त्रिया दीपस्तंभ आहेत. त्यांचं जीवन समजून घेताना आपलं मन स्वत:त डोकावतं. ‘मी कोण’ याचा शोध घ्यायला लागतं. नवी जाग येते आणि माणुसकीचं अजरामर सत्य कानामनात घुमू लागतं....