Skip to product information
1 of 2

Payal Books

Maharashtrachi Lokayatra : सामाजिक संघर्ष आणि चळवळींचा इतिहास By Dr. Sadanand More

Regular price Rs. 810.00
Regular price Rs. 900.00 Sale price Rs. 810.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
PUBLICATONS
  • महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींमागील विचारविश्वाची  मांडणी करणारा बृहद ग्रंथ 
  • प्राचीन धर्मग्रंथ, मध्ययुगीन कालखंडातील संत चळवळ, धर्म, पंथ आणि त्यांच्या संस्थापकांचे विचारव्यूह, अर्वाचीन काळातील अनेक समाजसुधारक, ब्रिटिश शासन काळ, स्वातंत्र्योत्तर काळ ते अलीकडील अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकापर्यंत झालेला महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा भूतकालीन, वर्तमानकालीन आढावा आणि भविष्यकालीन दिशा 
  • महाराष्ट्र द्रष्ट्या राज्यकर्त्यांनी जेवढा घडवला तेवढाच तो इथल्या संतांनी, विचारवंतांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनीही घडवला. या नेत्यांसोबत पुढे जाणाऱ्या इथल्या सर्वसामान्य लोकांनीही महाराष्ट्र घडवला. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांमधून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा प्रवास हा आपल्याला प्रगत समाजाकडे घेऊन जातो. स्वार्थासाठी सामाजिक प्रगतीमध्ये अडथळा आणणारी अनेक प्रतिगामी माणसंही याच समाजात असतात; आणि कालसुसंगत बदल स्वीकारत, चुकीच्या रूढी पुसून समाजाला पुढे नेणारी माणसंसुद्धा आपल्याच समाजात जन्माला येतात. महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या घटना-प्रसंगांचा आढावा घेत केलेली मांडणी 

  • काळाच्या पुढे असणारे संत, वारकरी, महानुभाव, लिंगायत आदी पंथ संस्थापक आणि त्यांचे आचारविचार, महात्मा फुले, न्या. रानडे, गो. ग. आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड, विठ्ठल रामजी शिंदे, प्रबोधनकार ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर, अशा अनेक थोरांमोठ्यांच्या विचारसरणी आणि कार्यासोबतच असंख्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कामाचीही नोंद डॉ. मोरे घेतात. महाराष्ट्राच्या इतिहासाला वळण देणारे अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग, घटना, असंख्य संदर्भ डॉ. मोरे सहज सोप्या भाषेत आपल्यासमोर मांडतात. (This is people's history in people's language.)

 

"महाराष्ट्राची लोकयात्रा" ग्रंथ कोणासाठी? 

  • महाराष्ट्राची जडणघडण, संस्कृती, भाषा, साहित्य, राजकारण, समाजकारण यांपैकी कोणत्याही क्षेत्रात रस असणाऱ्या प्रत्येकासाठी  
  • राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान आदी विषयांचे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक 
  • स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी 
  • धोरण ठरवणारे सत्ताधारी, सनदी अधिकारी 
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेले आणि होऊ पाहणारे 

लेखकाविषयी : 

  • अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
  • घुमान येथील 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (२०१५)
  • तुकाराम दर्शनसाठी साहित्य अकादमी पुरस्कार
  • महाराष्ट्राच्या साहित्य आणि महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक, समकालीन घटनांचे जागरूक भाष्यकार
  • वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक
  • पहिल्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (2012)
  • महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे विविध पैलू उलगडून दाखवणारे "तुकाराम दर्शन", "लोकमान्य ते महात्मा" आणि "गर्जा महाराष्ट्र"  हे ग्रंथ लिहून इतिहासलेखनाचा एक वेगळा बाज सिद्ध केला. "त्रयोदशी", "मंथन", "प्रसादाची वाणी", "निवडक सकल संत सार्थ गाथा", "लोकमान्य टिळक चरित्र", "ताटीचे अभंग : एक विवेचन", "या सम हा : योगेश्‍वर कृष्णाचे वैचारिक चरित्र", "समाजसुधारक", "विद्रोहाचे व्याकरण : महात्मा जोतीराव फुले यांचे निवडक साहित्य", "थोरांचे अज्ञात पैलू" आदी ग्रंथ प्रकाशित. ‘उजळल्या दिशा’ आणि ‘शिवचरित्र’ या नाटकांमधून महाराष्ट्राच्या राजकारणाचा कलात्मक पातळीवरून आविष्कार