Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Maharashtrachi Kulswamini Arthat Shri Tulja Bhavani महाराष्ट्राची कुलस्वामिनी अर्थात श्री तुळजा भवानी

Regular price Rs. 490.00
Regular price Rs. 550.00 Sale price Rs. 490.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Maharashtrachi Kulswamini Arthat Shri Tulja Bhavani महाराष्ट्राची कुलस्वामिनी अर्थात श्री तुळजा भवानी  दत्तात्रय माधवराव कुळकर्णी 

“महाराष्ट्राची कुलस्वामिनी अर्थात श्रीतुळजा भवानी”
हे १९२० साली लिहिलेले पुस्तक.
या पुस्तकासाठी लेखकास त्यावेळी भारत इतिहास संशोधक मंडळाने म्हणजे मंडळाचे तत्कालिन चिटणिस खंडेराव चिंतामण मेहेंदळे आणि म. म. द. वा. पोतदार यांनी खुप मदत केली होती. या मदतीबद्दल लेखकाने पुस्तकात त्यांचे आभार मानलेले आहेत. मंडळाचे कार्यालय त्यावेळी आप्पा बळवंताचा वाडा, पुणे येथे होते. पुस्तकाला दत्तो अप्पाजी तुळजापुरकर यांची दीर्घ प्रस्तावना आहे.
या पुस्तकात श्रीतुळजाभवानी ची विविध स्तवने, स्तोत्रे, श्रीतुळजासहस्रनामे, भवानीसहस्रनामे, आरत्या, अभंग, आर्या, पदे अशा विविध गोष्टी एकत्र दिलेल्या आहेत. या सोबतच श्रीतुळजाभवानी संबंधीच्या विविध पारंपरिक कथा, तुळजापूर स्थानाची माहिती, श्रीतुळजाभवानी मूर्तिची माहिती, मंदिरातील पुजारी, सेवकांच्या कामांची यादी, देवीचे कुळाचार, देवालयाचा खर्च, विविध पूजा आणि विधी, देवीची अलंकारपूजा आणि वर्षातील सात सणांच्या दिवशी देवीला घालायच्या अलंकारांच्या याद्या, देवीला अनेक मान्यवरांनी पूर्वापार अर्पण केलेल्या विविध अलंकारांच्या याद्या अशी विस्तृत माहिती येते.
पुस्तकात श्रीतुळजाभवानी आणि छ्त्रपती शिवाजी महाराजांचे भोसले घराणे यावरही एक प्रकरण आहे. त्याशिवाय दैनंदिन चालणार्या पूजाअर्चा, नवरात्र आणि विजयादशमी या सोहळ्यांचे विशेष कुलाचार आणि श्रीतुळजाभवानी देवीला राजे राजवाड्यांकडून अर्पण केलेल्या विविध दानांचे संबंधित ताम्रपट, दानपत्रे यांची माहिती ही दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे एक, छत्रपती शाहु महाराजांची एक-दोन आणि पेशवे अशा मान्यवरांची पत्रेही यात आहेत. ,