“हळदी घाटीच्या युद्धात तसे आपले अपरिमित नुकसान झाले. मन्नासिंह, रामसिंह तोमर आणि त्याची मुले, भीमसिंह दोदिया, बिंदा झाला, बदनोरचा रामदास, शंकरदास राठोड, रावत नैतसीसारखे अनेक जीवाला जीव देणारे साथीदार आणि सैनिक आपण गमावले; पण युद्धाने आपल्याला काही शिकवले देखील.. यापुढे एवढ्या मोठ्या बलाढ्य शत्रूसमोर लढण्यासाठी मैदानात उतरण्याचा मूर्खपणा आपण कधीच करणार नाही. त्यात विजय मिळाला तरी आपले कधीच भरून न काढता येण्यासारखे नुकसान होईल. ती जबाबदारी आम्हाला पत्करायची नाही. या डोंगराळ भागात आपल्या आणि भिलराज पुंजाच्या वीरांसाठी लढण्याची अत्यंत सोयीची पद्धत म्हणजे गनिमी काव्याचे युद्ध! आपण फक्त तिचा अवलंब करून मोगलांना मेवाडबाहेर पिटाळून लावू शकू.”
Maharana Pratapsingh | महाराणा प्रतापसिंह by AUTHOR :- Niranjan Ghate
Regular price
Rs. 293.00
Regular price
Rs. 325.00
Sale price
Rs. 293.00
Unit price
per