Mahant महंत by V V Shirwadkar
Mahant महंत by V V Shirwadkar
महंत वि. वा. शिरवाडकर वि. वा. शिरवाडकरांनी पहिल्यांदाचा मुळाबरहुकूम अनुवाद केलेल नाटक ज्यॉं आनुई यांचे ’बेकेट’. परंतुअ त्यांचा नाटककार म्हणून कल सुरुवातीपासून भारतीय पार्श्वभूमी ठेवून रूपांतराचा. सुरूवातीच्या काळात त्यांनी ऑस्कर वाईल्ड, मॅटरलिंक आणि पुढे शेक्सपीयरच्या नाटकांची या पद्धतीने रूपांतरे केली. ’बेकेट’मध्ये माणसातील साधुत्व आणि पशुत्व यांच्यातील संघर्ष आहे, तसाच धर्मसत्ता आणि राजसत्ता यांतीलही. धर्मकल्पना हा विषय प्राचीन भारताच्या पार्श्वभूमीवर विशेषकरून उठून दिसेल हया विचाराने शिरवाडकरांनी त्याच विषयावर ’महंत’ हे नाटक लिहिले. हया विषयाचे आकर्षक इंग्रजीत टी. एस. ईलियटसारख्या थोर लेखकाला वाटले. मराठीतही वसंत कानेटकर, अरुण होर्णेकर इत्यादिकांनी निरनिराळ्या पद्धतीने हा विषय मांडला. ’महंत’मधे शिरवाडकरांनी ’धर्मसत्तेला’ लोकभिमुख जनसत्तेचे अधिष्ठान दिले आहे. मुळात १९८६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या नाटकाची ही शिरवाडकर जन्मशताब्दी विशेष आवृत्ती. संहिता आणि नाटयप्रयोग यांविषयी लेखक, प्रकाशक आणि नाटयकर्मी बाळ धुरी आणि रवींद्र मंकणी यांची टिपणे दिली आहेत.