स्वतंत्र अभिव्यक्ती, मुग्ध प्रणयभावना, प्रणयानुभवातील शृंगार, अभिव्यक्तीची नागर रीत ही महानोरांच्या कवितेची मुख्य वैशिष्ट्ये असली तरीही, निसर्ग आणि भूमी हा त्यांच्या कवितेचा आत्मा राहिला आहे.
एकाचवेळी ग्रामीण आणि नागर अभिरुचीला सांभाळणारी त्यांची कविता ग्रामजीवन आणि निसर्गाचे गहिरे परिमाण घेऊन येते. निसर्गाच्या साक्षात्काराची अनेक रूपं महानोरांच्या कवितेत दिसतात. महानोरांच्या सचित्र आणि लयबद्ध कवितेने तसेच आशयघन गीतांनी मराठी काव्य समृद्ध केले आहे. रानावनातल्या ह्या कवितांनी मराठी रसिकांना लळाच लावला आहे.
अशा महत्त्वपूर्ण कवीची आणि त्यांच्या कवितांची समीक्षा करणारा, तसेच महानोरांच्या गद्य लेखनाचीही चर्चा करणारा , डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांचा हा ग्रंथ महानोरांच्या चाहत्यांना, अभ्यासकांना उपयुक्त ठरेल.
संदर्भमूल्य असणारा हा ग्रंथ काव्याभ्यासकांनी संग्रही ठेवावा असाच आहे