Mahamaya महामाया by R C Dhere, Tara Bhavalakar रा चि ढेरे तारा भवाळकर
महामाया
- डॉ. रा. चिं. ढेरे आणि
डॉ. तारा भवाळकर
तब्बल छत्तीस वर्षांनी... 'महामाया' पुन्हा येतेय.
पुस्तकाबद्दल थोडक्यात :-
डॉ. रा. चिं. ढेरे आणि डॉ. तारा भवाळकर यांनी लिहिलेला हा संशोधनात्मक ग्रंथ १९८८ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाला. १९९५ नंतर तो अनुपलब्ध होता. अभ्यासकांसाठी, उत्सुक वाचकांसाठी `पद्मगंधा` प्रकाशनातर्फे तो पुन्हा उपलब्ध होतो आहे.
`महामाया` हा ग्रंथ कैकाडी समाजाचा सामाजिक-सांस्कृतिक शोध घेणारा ग्रंथ आहे, असं म्हणता येईल. मातृदेवतांच्या माहेराचे रहस्य उलगडणारा हा महत्त्वाचा ग्रंथ आहे.
कैकाडी स्त्री म्हणजे सप्तमातृकांचे माहेर. कैकाडीण म्हणजे सर्व मातृदेवतांची माता, अशी कैकाडी समाजाची धारणा आहेच, पण मातृदेवतांच्या उपासकांचीही ती दृढ श्रद्धा आहे. विश्वाच्या आधीपासून या आदिशक्तीची नांदणूक येथे असल्याची ग्वाही पोतराजांच्या गीतांमधून, संतांच्या रचनांमधून दिली गेली आहे. आकार-निराकाराची साक्षिणी, ब्रह्माची कामशक्ती अन् सकल नामरुपात्मक विश्वाची विधात्री अशी ही `महामाया` आहे.
मराठी संतांच्या भारूडातील कैकाय आणि तंजावरी परंपरेतील कुरवंजी नाटकांतील कैकाडीण यांचे आत्मरहस्य उलगडून दाखवणारा हा महत्त्वाचा ग्रंथ आता तब्बल ३६ वर्षांनी पुन्हा एकदा वाचकांना उपलब्ध होत आहे.