Mahakavi Kalidas By: Dr. Chandrashekhar Chingare
जागतिक वाङ्मयात अजरामर झालेले
महाभाग्यशाली कवी आणि नाटककार फारच थोडे ! महाकवी कालिदासाचे नाव अशा सरस्वतीपुत्रांच्या यादीत बहुधा पहिलेच आहे. हा 'भारतीयत्वाचा' वा संस्कृतचा दुराभिमान नाही, ही वस्तुस्थिती आहे! एरवी गटे सारखा पाश्चात्त्य विद्वान कवी 'शाकुंतल' डोक्यावर घेऊन का अक्षरश: नाचला असता? आणि असे असंख्य रसिक होते आणि आहेत.
- पण ह्या महाकवीचे जीवन कसे होते? त्याचा स्वभाव, गुणावगुण कोणते होते? अत्यानंदाने बेभान करणारे आणि हृदय पिळवटून टाकणारे कोणते जीवनानुभव त्याने घेतले ? त्याच्या साहित्यकृतीत त्यांचे प्रतिबिंब कुठे आणि कसे पडले? त्याच्या कुशाग्र बुद्धिमतेचे आणि अलौकिक प्रतिभेचे रहस्य कशात असावे ? -तो सुखी होता? कृतार्थ होता ? -तो दुःखी, व्यथित होता ? - त्याचे महानिर्वाण कुठे, कसे आणि का झाले ?