प्रश्न असा आहे की, भीष्मांसारखा विचारवंत, वयोवृद्ध श्रेष्ठ क्षत्रिय योद्धा, ज्यांनी म्हटलं होतं, ‘‘मी त्रैलोक्याचा त्याग करू शकतो, इंद्रत्वाचा त्याग करू शकतो; परंतु सत्याचा त्याग कदापिही करू शकत नाही. भलेही पृथ्वी गंधाचा त्याग करो, सूर्य प्रकाशाचा
त्याग करो, पाणी मधुर रसाचा त्याग करो, ज्योती रूपाचा
त्याग करो, वायू चक्राकार गती-गुणाचा त्याग करो,
तरीही मी सत्याचा परित्याग करू शकणार नाही,’’
अशा या भीष्मांनी, विशेष म्हणजे ते स्वतः वर नसतानाही, आपल्या रथात कन्यांना जबरीनं चढवून म्हणावं,
‘‘काही लोक कन्यांना विविध अलंकारांनी सजवून धनदानपूर्वक गुणवान योग्य वराच्या हाती सोपवतात. काही लोक दोन गायी वराला देऊन त्यास कन्या देतात, काहीजण प्रतिज्ञा केल्याप्रमाणे धनदानपूर्वक कन्यादान करतात. काही मधुर संभाषणाद्वारे
स्त्रीचं मनोरंजन करून तिचा हात आपल्या हाती घेतात.
विद्वानांनी आठ प्रकारच्या विवाहांचा निर्देश केला आहे.
स्वयंवर हा विवाह-विधी उत्तम मानला जातो.
राजेलोक स्वयंवरविवाह पद्धतच अधिक पसंत करतात.
धर्मवादी लोक त्यापेक्षाही पराक्रमाचं प्रदर्शन करून जिंकून आणलेल्या कन्येशी विवाह करणं अधिक पसंत करतात.
तेव्हा मी त्यांना पराक्रमपूर्वक जिंकून आणलं आहे.
मी युद्धास तयार आहे. आपल्या इच्छेप्रमाणे तुम्ही युद्ध किंवा
अन्य उपायांनी यांना सोडविण्याचा प्रयत्न करू नका.’’
हे वागणं काय त्यांना शोभेसं आहे?
- या पुस्तकातून