Skip to product information
1 of 2

Payal Books

Magardoha By Shashikant Waman Kale

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
रहस्यं आणि मिथकांच्या चक्रव्यूहात बदलणारी मनोदैहिकता टिपणाऱ्या अकरा गूढकथांचा संग्रह म्हणजे मगरडोह होय. पुनर्जन्मावर आधारित पहिलीच कथा ‘घातचक्र’..पत्नीसह रेल्वेप्रवासाला निघालेल्या श्यामकांतच्या गप्पांमध्ये त्याची गतकाळातील स्टेनो कम सेक्रेटरी असलेल्या ज्यूली परेराचा विषय निघतो आणि श्यामकांत अस्वस्थ होतो. त्याच प्रवासात श्यामकांत अचानक गायब होतो..श्यामकांतच्या या गायब होण्यामागचं रहस्यं आणि त्याच्या शोधाचा थरार यांची विलक्षण गुंफण ‘घातचक्र’मध्ये अनुभवास येते. ‘सन १८६०चा रुपया’ या कथेतील नायक एका लहानशा अपघातात एका खड्ड्यात पडतो. पण त्याला जाग येते तेंव्हा तो थेट १८६० सालात पोहोचलेला असतो. तर ‘चकवा’ ही कथा आहे घरदार सोडलेल्या संजय गितेची. हा गिते उतारवयात आपल्या मूळ गावी भेट देतो, त्या घरात माणसांच्या वावराच्या खुणा असतात; पण एकही माणूस त्याच्या दृष्टीला पडत नाही. त्यामुळे ते आपल्या मनाची अशी समजूत करून घेतात, की आपल्या मनातील सूड भावनेमुळे आपलं कुटुंब नाहीसं झालं आहे. संजय गितेभोवतीचं हे गूढवलय वाचकांनाही गुंगवून सोडतं. ‘रेखाचा आरसा’ आणि ‘रंजनाची प्रतिमा’ या कथांच्या नायिकाही अशाच विस्मयकारक जाणिवांशी जोडलेल्या आहेत. आपल्या मित्राला आरसा भेट देणारी रेखा, त्या आरशातूनच रोज रात्री त्याला भेटायला येते ही कल्पनाच थरारक वाटते. तर ‘रंजनाची प्रतिमा’ कथेतली रंजना एखाद्या गूढ नायिकेसारखी स्तंभित करते. कथासंग्रहाचं शीर्षक असणारी ‘मगरडोह’ही कथाही उत्कंठेचा शिरोबिंदू गाठायला लावणारी आहे. एका चित्राभोवती फिरणारी गूढता या कथेत रहस्यमयरीत्या साकारलेली आहे. ‘पहेली’, ‘अरुंधतीचा डबा’, ‘बंद पाकीट’, ‘डोकेदुखी’, ‘उजाली’या कथाही माणसाचे मनोव्यापार...त्या मनोव्यापारांतील गूढता...मानवी जीवनातील अतर्क्यता...याचं रंजकतेने चित्रण करतात. लेखक दैनंदिन जीवनातील साधे प्रसंग घेऊन अशा प्रसंगांनाही एका अनामिक गूढवलयाशी जोडतो. आणि वाचकाला नवी वाचनानुभूती देतो.