Skip to product information
1 of 2

Payal Books

Madhumeh aani Ayurvedeeya Upchar By Dr. Ankush Jadhav

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

मधुमेहाच्या निदानासाठी काय काय करावे या माहितीने मधुमेही व्यक्तींच्या मनातील अनेक गैरसमज दूर होतील. मधुमेह अनियंत्रित राहिल्याने शरीरावर होणार्‍या परिणामांचे वर्णन योग्य शब्दांत केले आहे. मधुमेहीने लग्न कोणाशी करावे आणि केले तर मधुमेही व्यक्तीशी करावे की नाही, याविषयी केलेली चर्चा महत्त्वाची आहे. गरोदर मधुमेही स्त्रीने काय काळजी घ्यावी हेही अतिशय शास्त्रीय पद्धतीने सांगितले आहे. मधुमेहीने स्वत:चा मधुमेह आटोक्यात ठेवण्यासाठी स्वत:च प्रयत्न करावयाचा असतो. फक्त नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असतो. यासाठी मधुमेहाविषयी असलेली सर्व माहिती मिळवायला हवी.

मधुमेहींचा आहार याविषयीची चर्चा शास्त्रीय पद्धतीचा वापर व उष्मांकांचा (calories) विचार करून जरी केली असली, तरीसुद्धा आहाराची रचना भारतीय स्वयंपाकशास्त्राचा विचार करूनच केलेली आहे, हे इथे खास नमूद करावेसे वाटते. आहारोपचार सरळ व सोपा असावा, त्यात भिन्नता असावी. आहार सकस संतुलित आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वस्त असावा. या गोष्टीची जाणीव येथे ठेवलेली आहे.

‘औषधोपचार’ या प्रकरणात तोंडाने घ्यावयाच्या गोळ्या आणि इन्सुलिन याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे.

व्यायामामुळे होणारे फायदे व विशेषत: मधुमेहावर काय परिणाम होतो, याची चर्चा फारच महत्त्वाची ठरेल.