'हा हिंदू वहशतवाद आहे,' अशा आशयाच्या बातम्या वर्तमानपत्रांच्या मथळ्यांतून उच्चरवाने सांगितल्या जात होत्या. राष्ट्राच्या संपूर्ण इतिहासात प्रथमच एखाद्या आर्मी ऑफिसरला. लेफ्ट, कर्नल पुरोहित यांना सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या संदर्भात अटक झाली होती. कोण होती ही व्यक्ती आणि तिचं नाव वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर का चिकटवलं गेलं होतं? सर्वांना सोडून याच व्यक्तीला का बरं यात गोवलं गेलं होतं? ते खरोखर गुन्हेगार होते का? की त्यांना षड्यंत्रात गोवलं गेलं होत? त्यांना बळीचा बकरा बनवलं गेलं होतं का? न्यायालयात खटले चालू असतानाच्या नऊ वर्षांच्या प्रदीर्घ काळात या मानचिन्ह विभूषित अधिकाऱ्याला तुरुंगात डांबलं गेलं होतं; त्या कालावधीत त्यांच्या कुटुंबीयांची काय अवस्था झाली होती? 'लैफ्ट. कर्नल पुरोहित विश्वासघाताचा बळी?' या पुस्तकात याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे करत असताना, भयाण अशा षड्यंत्रावर प्रकाशझोत टाकलेला आहे. ते सर्व वाचताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहील.
Share
Choosing a selection results in a full page refresh.