PAYAL BOOKS
Lokshahitala Manus By Ashok Gopal, Avadhut Dongare लोकशाहीतला माणूस
Couldn't load pickup availability
Lokshahitala Manus By Ashok Gopal, Avadhut Dongare लोकशाहीतला माणूस
न्यू इंडिया फाउंडेशनचा ‘कमलादेवी चट्टोपाध्याय ग्रंथ पुरस्कार’ (२०२४) विजेतं पुस्तक डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१८९१-१९५६) हे आधुनिक भारतात आदर्शवत मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. १९३०च्या दशकापर्यंत भगवद्गीतेला आदरस्थानी मानून त्यातील अवतरणं वापरणारे आंबेडकर कालांतरानं हिंदू धर्माविरोधात का व कसे गेले? कोलंबिया विद्यापीठात त्यांनी गिरवलेल्या धड्यांचा प्रभाव महाडमध्ये १९२७ साली झालेल्या चवदार तळ्याच्या संघर्षावर आणि १९४०च्या दशकात भारतीय संविधानाच्या मसुदानिर्मितीवर कसा पडला? आपण हिंदू म्हणून मरणार नसल्याचं १९३५ साली जाहीर केलेल्या आंबेडकरांनी ‘हिंदू कोड बिल’ तयार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा का केली? एकीकडे व्यक्तिवादाचे कैवारी असणारे आंबेडकर दुसरीकडे बौद्ध धर्मातील सामूहिक नैतिकतेच्या जीवनमार्गावरही श्रद्धा का ठेवत होते? आंबेडकर वसाहतवादाचे समर्थक असल्याचं मानणं चुकीचं का आहे? आंबेडकरांनी मांडलेल्या आणि वापरलेल्या संकल्पनांचे वैचारिक स्रोत कोणते होते? आंबेडकर चळवळीमध्ये व्यग्र असताना त्यांची पहिली पत्नी रमाबाई यांचं काय झालं? आंबेडकरांसंबंधी शक्य तितके प्रश्न उपस्थित करण्याचा आणि शक्य तितक्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा काटेकोर प्रयत्न ‘लोकशाहीतला माणूस’ या पुस्तकात करण्यात आला आहे. अशोक गोपाळ यांनी आंबेडकरांचं मराठी व इंग्रजी भाषांमधील लेखन, त्यांची भाषणं व पत्रं यांचं वाचन केलंच; शिवाय, स्वतः आंबेडकरांनी काय वाचलं असेल त्याचंही वाचन केलं. अनेक संदर्भाची पडताळणी करून लिहिलेलं हे पुस्तक आंबेडकरांच्या जीवनचरित्रासोबतच त्यांचा वैचारिक प्रवासही चिकित्सकपणे उलगडून दाखवतं.
