‘नारद’ ही कादंबरी आगळ्यावेगळ्या स्वरूपाची आहे. भगवद्गीतेत अर्जुनाच्या शंकांचे, प्रश्नांचे निरसन भगवान श्रीकृष्णाने उपदेश करून केले आहे.
‘नारद’ कादंबरीत व्यास, सर्वसामान्यांच्या मनात येणारे प्रश्न नारदांना विचारत आहेत. व्यास हे उत्तम प्राश्निक आहेत! अध्यात्मशास्त्र, विश्वोत्पत्ती, पापपुण्य, देवाचे अस्तित्व, वेद, पुराणे, महाकाव्ये आणि धार्मिक ग्रंथ यांच्यामधील पारमार्थिक विषयांबद्दल अनेक शंका आपल्या मनात येतात.
व्यासांच्या मनात अशा शंकांचे काहूर निर्माण झाले आहे. या शंकांचे निरसन करण्यासाठी ते देवर्षी नारदांना प्रश्न विचारतात.
त्यामुळे ब्रह्ममानसपुत्र विश्वलोक वार्तासंज्ञापक, कीर्तनकार, भक्तियोगी महर्षी नारदमुनी; असे हे नारदमुनींचे, देव, ऋषी, मुनी या परंपरेतील वेगळे आणि व्यापक व्यक्तिमत्त्व, या कादंबरीत तुमच्या आमच्यात वावरताना भासते.