Loknishtha Adhyatmavad | लोकनिष्ठ अध्यात्मवाद Author: Dr. Anil Sahasrabuddhe
मानवाचे जीवन अध्यात्मप्रवण असावे. मानवी जीवनाच्या विविध व्यवस्था, व्यवहार, स्थापना व संस्था यांच्या स्थलकालपरिस्थितीच्या अंधपणातून बाहेर पडून विचार कसा करावा, याबद्दल सहस्रबुद्धे विश्लेषण करतात.
- फा.डॉ. नेल्सन फलकाव
लोकांना व्यक्तिनिष्ठ अध्यात्मवाद आणि अध्यात्मविरहित लोकनिष्ठा या गोष्टी स्वाभाविक व सोयीच्या वाटतात. पहिल्या प्रकारचे संन्यासी व साधक आपल्याला आपल्या देशात हवे तितके सापडतील तर अलीकडच्या काळातील विविध प्रकारचे पुरोगामी चळवळे हे दुसऱ्या प्रकारची उदाहरणे होत. लोकनिष्ठ अध्यात्मवाद हा सहस्रबुद्धेंचा पर्याय म्हणूनच महत्त्वाचा ठरतो.
- डॉ. सदानंद मोरे
ध्यानयोगाला सेवायोगाने पूर्णत्व लाभते, सामाजिकता जपणे महत्त्वाचे. माणसाचे देवाशी नाते आहे तसेच समाजाशी समांतर नाते असते. ते जणू माणसाचे दोन डोळे आहेत.
- फादर फ्रान्सिस दिब्रिटो
अनंतात सर्व ÉbÉs विराम पावतात. म्हणून प्रज्ञेच्या अनुभवांतच बुद्धीचे ध्येय पूर्ण होते. केवळ तर्काने मनुष्याला हे दर्शन होणार नाही. डॉ. सहस्रबुद्धे यांनी लोकनिष्ठ अध्यात्मवाद ही भूतमात्रांची मिरासदारी आहे अशी व्यापक भूमिका घेतली आहे.
- डॉ. मुहम्मद आजम