Skip to product information
1 of 2

Payal Books

Lok Aani Abhijat | लोक आणि अभिजात Author: Dr. Aruna Dhere|डॉ. अरुणा ढेरे

Regular price Rs. 205.00
Regular price Rs. 230.00 Sale price Rs. 205.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

या पुस्तकात डॉ. अरुणा ढेरे यांची लोकपरंपरा आणि 

अभिजात परंपरा यांच्या जिव्हाळ नात्याचं हृदयंगम दर्शन घडविणारी चाळीस ललित टिपणे समाविष्ट आहेत. 

कधी एखादं लोकगीत कानांवर पडतं, 

तर कधी एखादी लोककथा; कधी एखादी म्हण, 

एखादा वाक्प्रचार, तर कधी एखादी पूर्वापार समजूत. 

त्या त्या क्षणी, अभिजाताचं पोषण कुठून कसं होतं, 

ते उत्कटतेनं जाणवतं.

अन् अभिजात मधुरतेनं भरलेली एखादी रसाळ कविता वाचताना किंवा जीवनचिंतनाची प्रगल्भता प्रकट करणारी एखादी कथा ऐकताना लोक आणि अभिजात 

यांच्या अनुबंधाची विविध दर्शनं घडतात.

उभय परंपरांचं ते नातं उलगडणं हेच या ललित लेखनाचं 

सूत्र बनलं आहे. अतिशय संवेनदशीलतेनं आणि 

सूक्ष्मतेनं अर्थाचा अवकाश संपूर्ण समजून घेऊन केलेलं 

हे ललित लेखन जाणकार रसिकांना आपल्या विविधरंगी परंपरेच्या वैशिष्ट्यांची निश्चितच एक नवी जाणीव देणारं आहे