Local Mazi Sakhi By Madhuvati Sapre
Regular price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 162.00
Unit price
per
मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात पर्यावरणावर झालेल्या चर्चासत्रात एक महत्वाचा मुद्दा मांडला गेला. तो होता, `मुंबईचा लोकल-प्रवास` - लोकल प्रवासावर संशोधन करून वाचलेला पेपर. त्यात म्हटलं होतं की `मुंबईचा लोकल-प्रवास हे संथ मरणाचं सावट आहे`. या एका वाक्याने लेखिका दचकली. कारण तीही रोज लोकलने प्रवास करत होती. लोकलमध्ये रोज घडणा-या, घाबरवणा-या घटनांची ती साक्षीदार होती. त्यामुळे `संथ मरणाचं सावट` या संकल्पनेनं ती मुळापासून हादरली. मुंबईसारख्या प्रचंड गर्दीच्या महानगरात, सामाजिक, राजकीय अशा बेमुर्वत घटनांनी लोकल-प्रवाशांना बसणारा फटका, उदा. रेलरोको, बॉम्बस्फोट, आगी लागणे, झोपडपट्टीवाल्यांची दादागिरी, सिग्नल-यंत्रणा ठप्प होणे. परिणामी चाकरमान्यांना कार्यालयात पोहोचायला होणारा उशीर, लेटमार्क होणे वगैरे. या गोष्टी प्रवाशांच्या आवाक्यातल्या नसतात. यातून वैयक्तिक समस्या निर्माण होतात. आयुष्याचा समतोल बिघडत जातो. या सत्य घटनांवर अशी कादंबरी लेखिकेनं लिहिली आहे.