PAYAL BOOKS
Lobhas (लोभस) by Bhagwan Ingale
Couldn't load pickup availability
Lobhas (लोभस) by Bhagwan Ingale
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'शासनकर्ती जमात व्हा' असा क्रांतिकारी संदेश दिला होता कारण त्या शिवाय दलितांचा, तळागाळातल्या सामान्य जनतेचा उद्धार होणार नाही या विचाराचा प्रभाव सुशीलकुमारजींवर पडला होता. त्यानुसार ते सीआयडी खात्यातील चांगली प्रतिष्ठेची नोकरी सोडून राजकारणात आले. पक्षसंघटनेचे काम करीत राज्यमंत्री, अर्थमंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय ऊर्जामंत्री, केंद्रीय गृहमंत्री, आंध्र प्रदेशचे राज्यपाल ते उपराष्ट्रपती- पदाच्या उमेदवारीपर्यंत मजल मारली. सुशीलकुमारजींनी अगणित माणसे जोडली. ते विरोधकांशीदेखील आपुलकीने, सौजन्याने वागतात. मला अशा सुसंस्कारी राजकीय नेत्याचे जीवनचरित्र लिहिणे महत्त्वाचे वाटले. -- भगवान इंगळे

