Limitless (Marathi) by jim kwik
मेंदूची सर्वार्थाने काळजी घेत, आपल्या मर्यादांवर व विचारांवर मात करीत, असाधारण जीवन जगण्याची दिशा व दृष्टी देणारे ‘लिमिटलेस’ (अमर्याद) जिम क्विकचे पुस्तक जागतिक स्तरांवर विलक्षण गाजले. त्याचाच मराठी अनुवाद, ‘गोयल प्रकाशन’ पुणे तर्फे नुकताच प्रकाशित झाला. सवयींवर प्रभुत्त्व, उत्पादनशक्तीची अपरंपार वाढ, अमर्याद प्रेरकतेचा शोध, लक्षकेंद्रिकरण तसेच सातत्याने शिकत राहण्याची वृत्ती जिमने अभ्यासपूर्णरितीने विशद केली आहे. आपल्या क्षमता अमर्याद करायच्या असतील, तर आपल्याला आपल्या मेंदूचा नेमका वापर करता आला पाहिजे! ज्या गोष्टी तुम्ही मर्यादित करता, तुम्हाला खाली खेचतात, त्यातील आचारविचारांवर मात करीत, अमर्यादित सामर्थ्याला गवसणी घाला! मेंदूचा अधिकाधिक वापर करणं, स्मरणशक्तीत सुधारणा करणं तसेच कमालीच्या शीघ्रगतीनं शिकत नवनव्या गोष्टी आत्मसात करण्याची कला जिमने विस्ताराने कथन केली आहे. यातून साधारण व्यक्तीच्या जीवनात आमलाग्र बदल घडू शकतो, असे जिमला वाटते.