Skip to product information
1 of 2

Payal Books

Lighter Man Halak Kas Karav (लायटर मन हलकं कास करावं) by Yung Pueblo

Regular price Rs. 260.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 260.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

आपल्या अंतरात डोकावून स्वतःमधे आणि जगामधेसुध्दा मानसिक सुधारणा घडवून आणण्यास प्रतिबंध करणारे आपल्या मनावरचे ओझे कसे दूर करायचे याची एक अगदी पूर्णपणे सहृदय अशी योजना.

अनेक वर्षे मादक द्रव्यांने त्यांच्या तनमनाचा कबजा घेतल्यानंतर युंग पेब्लो यांनी 'उपचार व सुधारणा प्रक्रिये'चा मार्ग निवडला आणि अनुसरला. त्या प्रक्रियेदरम्यान त्यांच्या असे लक्षात आले की आपल्या अंतःप्रेरणेवर पूर्ण विश्वास ठेवून, ध्यानधारणेवर लक्ष केंद्रित करून ते जेव्हा त्यांच्या मनाला ग्रासून बसलेल्या चिंता, काळज्या, भीती या सर्वांना सरळ सरळ सामोरे गेले तेव्हा त्या सगळ्याचे ओझे मनावरून दूर होऊन त्यांना एकदम हलके वाटू लागले आणि त्यांची त्यांच्या मनाशी चांगली ओळख झाली, हृदय आणि मनाचे अस्तित्व त्यांना जाणवू लागले.

या पुस्तकात यंग पेब्लो यांनी त्यांनी स्वीकारली तशीच एखादी 'उपचार व सुधारणा प्रक्रिया' निवडून आपणही त्या मार्गावर कशी प्रगती करू शकतो प्रथम स्वत:कडे सहृदयतेने पाहायचे, मागचे सगळे सोडून द्यायचे आणि मग प्रक्रियेनुसार सुधारणा घडवून आणून भावनांच्या परिपक्वतेची प्राप्ती करून घ्यायची हे समजावून सांगतात. आपल्या सर्व कृतींमध्ये अधिक सहेतुकता आणून, निर्णयांमध्ये अधिक सहृदयता आणून, आपल्या विचारात अधिक स्पष्टता व स्वच्छता आणून आपला भविष्यकाळ उज्वल होण्यासाठी आपल्यामध्ये परिवर्तन कसे घडवून आणायचे याचे हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक आहे.