Skip to product information
1 of 2

Payal Books

Leh Ladakh ( लेह लडाख )

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

लडाखचा परिसर हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार णाही. देशाचा मुकुटमणी असलेल्या जम्मू काश्मीर मधल्या लडाख या ठिकाणाला भारताच्या पर्यटनाचा मानबिंदू म्हटले पाहिजे. सर्वात उत्तरेकडे असणार्‍या या हिर्‍याबद्दल बोलताना, लिहिताना प्रवासप्रेमींना विशेषणे कमी पडू लागतात. येथील अविस्मरणीय निसर्गसौंदर्याने भान हरपून जाते. दर्दी भटक्यांना कायमच हवाहवासा वाटणारा हा दुर्गम आणि थंड हवेचा प्रदेश अक्षरश: वेड लावून जातो. त्यामुळेच हे ठिकाण नुसते बघायचे नाही तर ते बाईकवर किंवा स्वत: गाडी चालवत नेऊन पाहायचे हे मी मनोमन ठरवले होतेच. हिमालयाची बर्फाच्छादित पर्वतशिखरे, मध्येच सखल भूमीत दिसणारे नद्यांचे खळाळणारे प्रवाह, त्या भोवतालची हिरवाई, तलावांचे पारदर्शी निळे पाणी, खोल दर्‍या, रोमांचकारी अनुभव देणारे रस्ते, असा नजारा पाहताना एका वेगळ्याच विश्वात जायला होते. या भूमीवर एक विलक्षण शांतीचा अनुभव येतो. बौध्द धर्माच्या पगड्यामुळे या प्रदेशाला अध्यात्मिक पार्श्वभूमीही आहे. आयुष्यात एकदा तरी या भागात फिरायला का आले पाहीजे याचे उत्तर तुम्हाला इथला निसर्गच देतो.