Left To Tell By Immaculee Ilibagiza, Steve Ervin Translated By Jyotsna Lele
Regular price
Rs. 265.00
Regular price
Rs. 295.00
Sale price
Rs. 265.00
Unit price
per
अफ्रिकेतील रवांडा या देशात १९९४ साली ‘हूतू’ आणि ‘तुत्सी’ या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठीत धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या इम्माकुली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणीवांना आवाहन करणारी ही इम्माकुली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे.