Skip to product information
1 of 2

Payal Book

Leela Tarot : Khand 3 लिला टॅरोट : खंड 3 - ओशो झेन सह by Adv. Sunita Page

Regular price Rs. 322.00
Regular price Rs. 360.00 Sale price Rs. 322.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
publications

Leela Tarot : Khand 3 लिला टॅरोट : खंड 3 - ओशो झेन सह by  Adv. Sunita Page

खंड तिनचा प्रवास ओशो झेन कार्ड्सचा अभ्यास करावा म्हणून सुरु झाला. प्रत्येक नविन गोष्ट सहजी स्विकारता येत नाही. आपण त्याची तुलना प्रस्थापित गोष्टीशी करत राहतो. Rider Waite आणि Osho Zen या दोन्ही Cards मागिल तत्त्वज्ञान वेगळे आहे. संकल्पना वेगळी आहे. दोन्ही कार्ड मध्ये प्रतिपाद्य केलेले विषय वेगळे असले तरी ते एकाच अंतिम सत्याचा बोध करतात. दोन्ही कार्ड्स ही THE FOOL ची जिवन कहाणी आहे. ईशतत्त्वात विलीन होईपर्यंत स्वतःला प्रत्येक वळणावर नव्याने भेटणाऱ्या मनस्वी जिवाची ही कथा आहे. सुरूवातीला कार्डस्चा अर्थ लावणे अवघड वाटते. मग हळूहळू ही चित्रलिपी बोलकी होते. अनुभवाने हा संवाद रंगू लागतो आणि नकळत ही कार्डस् आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होतात. सुरूवातीला अवघड वाटणारी ही कार्डर्स्, ह्याच्या प्रेमात पडले कि हृदयात आनंदाच्या लाटा निर्माण करतात. Waite आणि Osho हे दोघेही तितकेच महान व विद्वान होते. त्यामुळे दोघांनीही आपापल्या संकल्पना प्रभावीपणे मांडल्या. झेन कार्ड मधून कधी भगवदगीतेचा भास होतो तर कधी मनाला अदभूत शांती देणऱ्या योगवसिष्ठ ह्या ग्रंथाचा. कधी कधी ओशोंच्या कार्डमध्ये याज्ञवल्क्य ऋषिंच्या विचारांचा प्रभाव आढळून येतो. परमेश्वराचे अद्वैत रूप समजून घेण्यासाठी त्यांनी 'नेती नेती' सिद्धांत प्रतिपादित केला. भ्रामक कल्पनांच्या वेष्टनांमध्ये गुंडाळलेल्या गोष्टींचे सत्य जाणून घ्यायचे असेल तर सत्य सदृश्य गोष्टी दूर करायला हव्यात.