Payal Book
Leadership Intelligence (Marathi) बुधिशाली नेतृत्वाच्या जगतात by kamlesh soman
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
सर्वार्थाने मुक्त व निरंकूश Leadership Intelligence ही अगदी वेगळ्या प्रकारची गोष्ट आहे. भयापासून संपूर्ण मुक्तता, हीच खरी बुद्धिमत्ता असते. बुद्धिमान नेतृत्त्वाला असुरक्षिततेचे भान व ज्ञान असते. असे नेतृत्व आपल्या मनातील व मनाबाहेरील (अवतीभोवतीच्या) गोंधळाच्या स्वरुपाशी चांगला संवाद साधू शकते. जीवनाच्या संपूर्णत्वाला महत्व देत कारणांच्या व परिणामांच्या पलीकडे जाणारे बुद्धिशाली नेतृत्व, जीवनाच्या सर्व अंगोपांगांची एकात्मता सहजपणे साधते. असे नेतृत्व हे अतिशय सखोल, समृद्ध व अतीव समजूतदार, स्थिरावलेले व गंभीर असते. या नेतृत्त्वाच्या जगण्यात एक प्रकारची ग्रेस आणि संपूर्ण चांगुलपणा असतो. समस्येचा बाऊ न करणारे बुद्धिशाली नेतृत्त्व, भावनिक आवाहनाचे सामर्थ्य ओळखून असते. सर्वार्थाने प्रभावी आणि परिणामकारक व्यक्तिमत्त्व असलेल्या नेतृत्त्वातील चुंबकीय शक्ती आपल्या सहकार्यातील ऊर्जेला प्रवाहित करीत त्याला योग्य दिशा व दृष्टी देते. बद्धिशाली नेतृत्व नेहमीच तीक्ष्ण, लवचिक व सदैव सजग असते. एका आंतरिक रेट्यातून नवी वाट चोखाळत आणि प्रत्येक क्षण समग्रतेने व पूर्ण क्षमतेने जगत मोठ्या संवादशीलतेने सर्वात मिसळणे आणि सर्वांचेच होऊन जाणे बद्धिशाली नेतृत्वाला निकडीचे वाटते. सर्वात महत्वाचे म्हणजे सृजनशीलता व शोधकता यांचे अनोखे मिश्रण बुद्धिशाली नेतृत्वाकडे असते.

