Skip to product information
1 of 2

Payal Books

Lalbahadur: Lal Bahadur Shastri | लाल बहादुर शास्त्री by AUTHOR :- Shankar Karhade

Regular price Rs. 61.00
Regular price Rs. 70.00 Sale price Rs. 61.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications
राष्ट्रउभारणीसाठी अनेक राष्ट्रपुरुष आणि समाजपुरुषांचं कार्य महत्त्वाचं असतं. राष्ट्रासाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या अशा महामानवाची गाथा इतिहास जतन करीत असतो. म्हणूनच राष्ट्रपुरुषांच्या कार्याची व विचारांची ओळख नव्या पिढीला प्रेरणादायी ठरत असते.
कोणत्याही राष्ट्रात बालके ही संपत्ती असते. या संपत्तीच्या समृद्धीसाठी त्यावर संस्काराची आवश्यकता असते. असे संस्कार कुटुंब, परिवार, शिक्षण, सोबती आणि उत्तम साहित्य करत असते. बालकथा, बालकादंबऱ्या, परीकथा, विज्ञानकथा, मनोरंजनपर साहित्यासोबत चरित्रवाङ्मयही महत्त्वाचे आहे.
शंकर कऱ्हाडे हे समकालीन बालसाहित्य लेखनातले महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांनी उत्तम बालसाहित्य जाणीवपूर्वक लिहिले आहे. मुलांवर चरित्रलेखनातून संस्कार व्हावेत हा त्यांचा लेखनविशेष आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, डॉ. हेडगेवार या चरित्रग्रंथांतून वाचकांना प्रेरणा मिळू शकेल.