Payal Books
Lal Barphache Khore लाल बर्फाचे खोरे by Jitendra Dixit
Couldn't load pickup availability
जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे भारतीय संविधानातील कलम ३७०, ०५ ऑगस्ट २०१९ रोजी रद्द करण्यात आले. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाला.
स्वातंत्र्यापासूनच्या सात दशकांमध्ये घडलेल्या अनेक सामाजिक आणि राजकीय घटनांची पार्श्वभूमी काश्मीरच्या या ऎतिहासिक घटनेला आहे. या निर्णयामागे कोणत्या शक्ती होत्या? जम्मू काश्मीरच्या लोकांवर याचा काय परिणाम झाला? त्यांची यावर काय प्रतिक्रिया होती? आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे भविष्यात याचे परिणाम काय होतील?
ज्येष्ठ अनुभवी पत्रकार जीतेंद्र दीक्षित यांनी आपाल्या लाल बर्फाचे खोरे या पुस्तकात या प्रश्नांचा पूर्वग्रहविरहित ऊहापोह केलेला आहे आणि या स्वतंत्र भारताच्या इतिहासातल्या सर्वांत मोठ्या निर्णयानंतर काश्मीरमध्ये होणार्या बदलांची कथा सर्वसमावेशक पध्दतीने सांगितली आहे.
कलम ३७० रद्द होण्याआधीचे काश्मीर, रद्दबातल झाल्यानंतरचे लगेचचे काश्मीर आणि आत्ताचे काश्मीर हे विविध मुलाखतींद्वारे समोर आणले आहे. काश्मीर खोर्यामधला ऑंखो देखा हाल लेखकाने मांडला आहे. जम्मू काश्मीर विषयी आस्था असणार्या प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक.
