Lakhoba Savkar BY Dr. Mohan Divate
Lakhoba Savkar BY Dr. Mohan Divate
‘लखोबा सावकार’ ही कादंबरी शोकात्म असून ती मानवी भाव-भावनांच्या विविध छटांनी रंगलेली आहे. डॉ. मोहन दिवटे यांनी ‘लखोबा सावकार’ या नायकाचे विविध वास्तववादी पदर या कादंबरीतून अतिशय वेधकपणे मांडले आहेत. जगण्याच्या संघर्षात लखोबा वेगवेगळ्या वाटा जोखाळतो. दुकानदारी, व्यापार, सावकारी, गुत्तेदारी, शिक्षण, राजकारण या सर्वच क्षेत्रात लाखोबाने स्वतःचा ठसा उमटवायचा प्रयत्न केला आणि त्यातून ही कादंबरी लेखकाने अतिशय आकर्षकरित्या गुंफली आहे. ही कादंबरी अतिशय कलात्मक असून वास्तव आणि मानवी जीवनाचा संघर्ष यांची एक अनोखी कहाणी आहे. वाचकांना खिळवून ठेवणारी नाट्यपूर्ण अशी ग्रामीण जीवनातील वास्तव मांडणारी वाचनीय कादंबरी आहे.