Lage Shahiri Garjaya | लागे शाहिरी गर्जाया Author: Dr. Ramchandra Dekhane|डॉ. रामचंद्र देखणे
शाहिरांच्या चरित्राविषयी ऐकीव कथा सांगितल्या जातात. त्याच कथा पुढे वेगळ्या पद्धतीने रूढ होतात आणि शाहिरांचे मूळ चरित्र बाजूला पडते. यामुळे लावणी-पोवाड्यांतून,
तमाशा खेळांतून लोकांपुढे आलेल्या शाहिरांची वेगळीच प्रतिमा लोकमानसात उभी राहते.
लावणी शृंगारात नटलेला शाहीर अध्यात्मशास्त्राचा जाणकार होता; तत्त्वज्ञानाचा अभ्यासक होता, संत-साहित्याचा उपासक होता हे त्याच्या खर्या चरित्रावरून उमगून येते.
कलेच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजन व प्रबोधनही केले.
शाहिरांचे उपलब्ध साहित्य, मनोवृत्ती, ऐतिहासिक संदर्भ,
त्या काळाची समाजस्थिती, या सर्वांचा विचार करून कल्पित कथांना काहीसे दूर करून शाहिरांचे खरे रूप मांडण्याचा
ह्या पुस्तकात प्रयत्न केला आहे.
शाहिरी परंपरेत अनेक शाहीर उदयास आले तरीही प्रातिनिधिक स्वरूपात पेशवाईतील शाहीर रामजोशी, होनाजी-बाळा, परशराम आणि अलीकडच्या काळातील तमाशासम्राट शाहीर पठ्ठे बापूराव यांचे चरित्र ललितकथेच्या स्वरूपात मांडून त्यांच्या महत्त्वाच्या आणि लोकप्रिय रचनाही या पुस्तकात दिल्या आहेत.
लोकसाहित्याचे अभ्यासक या पुस्तकाचे नक्कीच
स्वागत करतील.