कवी लक्ष्मण महाडिक यांची कविता मी पाच दहा वर्षापासून वाचतो आहे. त्यांच्या तोंडून ऐकतो आहे. आज या कविता एकत्र वाचतांना खूप बरं वाटलं. खेडं, खेड्यातलं कुणब्यांचं जगणं कितीही सावरलं… नीट शैतीवाडी संसार केला तरी आयुष्यात आलेली फरफट… कमालीचं दुःख त्याला फोडूनच टाकतं. पुन्हा पुन्हा उभा राहिल्याचा त्याचा आनंदही फार काळ टिकत नाही. असं अंगावर कोसळणारं सगळं काही. हे सगळं काही घेऊनही तो जाहीरपणानं तक्रार फारशी करीत नाही की आकांडतांडव करून कुणाला शिव्याही घालीत नाही. खूप सहन करण्याचं, दुःख वेचण्याचं, त्याचं अगभूत सोशिकपण व शहाणपण तो भजन, कीर्तन प्रवचनातूनच शिकलेला आहे. त्याच्या खेड्यांच्या मुक्त विद्यापीठाचा कुलगुरू आजही शेतकरी महाकवी तुकारामच आहे. अशी एकही गोष्ट नाही की, जी तुकारामांच्या अभंगांनी, कवितांनी सांगितलेली नाही. जीवन जगण्याचा कुणब्यासाठीचा सगळा जगण्यातला कळवळा अगदी साध्यासाध्या शब्दांनी तुकोबांनी दिला. खेडं, शेती तिथलं दु:ख, आनंद व समाजातल्या नात्यागोत्यांची गुंतवळ अख्खी तुकोबांनी दिली. तिचंच प्रतिरूप आजच्या काळात वेगळ्या अनुभवांनी नव्या संदर्भात लक्ष्मण महाडिकांसारखे कवी कवितेतून उभं करताहेत. या खेड्यामधल्या आजच्या निष्पर्ण झालेल्या कुणब्यांची ही वेणा. यातले शेतीतले खास शब्द, शेतीतल्या प्रतिमा, काही अवस्था, काही हंगाम हे शेतकरी जीवन जगलेल्यांनाच नीट समजू शकतात. अशी ही शेतकऱ्यांची शब्दकळा व दु:ख वेणा घेऊन निघालेली लक्ष्मण महाडिकांची कविता पुन्हा पुन्हा वाचतांना अस्वस्थ करते. जगण्याच्या यातनांनी ओतपोत भरलेली… ओस होत चाललेली ही खेडी… माणसं… त्यांच्याच शब्दात… शहरांच्या गरोदरपणात आणखीनच वेदना देणारी. त्या सगळ्या दैन्य- दारिद्र्याची कुतरओढ करून सुन्न करणारी ही साधी सरळ अशी कविता आहे. अशी खोल आतून, प्राणातून व कुणव्यानं भुईशी, आकाशाशी, पिकांतल्या प्रत्येक घटकाशी संवाद करावा. अशी कविता. कवी लक्ष्मण महाडिक हे नाममात्र.
Payal Books
Kunbyachi Kavita | कुणब्याची कविता by Laxman Mahadik | लक्ष्मण महाडिक
Regular price
Rs. 116.00
Regular price
Rs. 130.00
Sale price
Rs. 116.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
