Payal Books
Coronachya Krushnachhayet By Prof Dr Mrudula Bele
Couldn't load pickup availability
'कोरोनाचा विषाणू बघता बघता एका देशाच्या सीमा ओलांडून बाहेर पडला. सगळ्या जगावर हे सावट पसरलं. कोरोनामुळे बळी पडलेल्या मृतांची संख्या भीतीदायक होती. बुद्धिमान मानवजातीसमोर या विषाणूनं हे भयंकर आव्हान उभं केलं. हा विषाणू कुठून आला, कसा पसरला, जगभरात अनेक देश त्याचा सामना कसा करत आहेत, भारत त्याच्याशी कसा लढा देत आहे - अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा वेध घेणारं आणि त्याबरोबरच – कोरोनानंतरची बदलणारी भू-राजकीय समीकरणं, औषध-संशोधन आणि निर्मितीच्या क्षेत्रातली व्यापक होणारी आव्हानं याचाही लेखाजोखा मांडणारं पुस्तक! भविष्यात अशा किती लढायांना माणसाला सामोरं जावं लागू शकेल, कुणास ठाऊक? त्यामुळे या विषयाची सामान्य माणसाला सोप्या भाषेत ओळख करून देणं हीच आजची सर्वात मोठी गरज! औषधनिर्मितीच्या क्षेत्रात जवळपास दोन दशकं कार्यरत असणाऱ्या अभ्यासक डॉ. मृदुला बेळे यांनी सांगितलेली धोकादायक विषाणू आणि चिवट मनुष्यजातीच्या संघर्षाची कहाणी कोरोनाच्या कृष्णछायेत...'
