Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Kon Ahe Bharat Mata By Purushottam Agraval कोण आहे भारत माता पुरुषोत्तम अग्रवाल

Regular price Rs. 440.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 440.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Kon Ahe Bharat Mata By Purushottam Agraval कोण आहे भारत माता पुरुषोत्तम अग्रवाल

ज्या घोषणेत तुम्ही भारतमातेच्या विजयाची इच्छा बाळगता ती ही भारतमाता कोण आहे?’ असा प्रश्न १९३६मध्ये एका सार्वजनिक सभेत जवाहरलाल नेहरूंनी विचारला होता. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे आघाडीचे नेते आणि पुढे देशाचे पहिले पतप्रधान झालेले हे तेच जवाहरलाल होते. त्यांनी या भाषणात नंतर असे जाहीर केले होते की, भारतातील पर्वत आणि नद्या, जंगले आणि अफाट शेते या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रिय होत्याच, पण तरीही अखेरीस या विशाल भूमीत सर्वत्र पसरलेले भारतातील लोकच जास्त महत्त्वाचे होते… भारतमाता म्हणजे हे कोट्यवधी लोकच असले पाहिजेत आणि भारतमातेचा विजय याचा अर्थ या लोकांचा विजय असाच असला पाहिजे. ‘हे पुस्तक आपल्याला या लोकशाहीबादी आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनामागे असलेल्या प्रामाणिक मनाचे, त्याच्या विचाराचे दर्शन घडवते. सध्याच्या ज्या काळात भारताच्या कोट्यवधी रहिवाशांना आणि नागरिकांना वगळणाऱ्या भारताच्या जहाल कल्पनांची उभारणी करण्यासाठी ‘राष्ट्रवादाचा’ आणि ‘भारत माता की जय’ या घोषणेचा वापर केला जात आहे, विशेषतः या काळात हे पुस्तक सुसंगत, समयोचित ठरते.