Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Kimayagar Rasayanshastra By Achyut Godbole किमयागार रसायनशास्त्र

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Kimayagar Rasayanshastra By Achyut Godbole किमयागार रसायनशास्त्र

किमयागार‌’ म्हणजे खरंच विश्वाचा इतिहास आहे, तो विज्ञानाचा इतिहास आहे, त्यात शास्त्रज्ञांची चरित्रं आणि बऱ्याच गंमतीजमती आहेत. यातून खरीखुरी विज्ञानाची तत्त्वं सोप्या भाषेत, हसतखेळत शिकता येतील. हा एक उत्सव आहे, जल्लोष आहे- मानवी धारिष्ट्याचा, जिद्दीचा, कुतूहलाचा, हट्‌‍टीपणाचा, वेडेपणाचा, स्वार्थाचा, निःस्वार्थीपणाचा एकंदरीत सगळं काही जे मानवी आहे त्या सगळ्यांचा.

यात सर्वप्रथम भौतिकशास्त्र किंवा फिजिक्स आहे. त्यात तीन भाग आहेत. एक म्हणजे, रिलेटिव्हिटीपर्यंतचा प्रवास, दुसरा म्हणजे, क्वांटम मेकॅनिक्स आणि तिसरा म्हणजे, कॉस्मॉलॉजी यांचा. विश्व कसं निर्माण झालं याची गोष्ट इथं संपते. यानंतर जिओलॉजी किंवा भूशास्त्र आहे. यात पृथ्वीचं विज्ञान तर आहेच; पण त्याचा शोध घेतानाच्या अनेक गमतीजमती आहेत. यानंतर केमिस्ट्री किंवा रसायनशास्त्र आहे. त्यात सगळी रसायनं इनऑर्गेनिक आणि ऑर्गेनिक यांच्याविषयीच्या थिअरीज तर आहेतच; पण इथं आपल्याला अनेक विक्षिप्त शास्त्रज्ञही भेटतील. सगळ्यात शेवटी बायॉलॉजी किंवा जीवशास्त्र आहे. पहिल्या जीवनिर्मितीपासून ते माणूस तयार होण्यापर्यंतची कहाणी त्यात रेखाटलीय. या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला असंख्य शास्त्रज्ञ भेटतील. काही माहीत असलेले आणि काही कदाचित माहीत नसलेले; आणि यात सहसा बाहेर फारशा माहीत नसलेल्या त्यांच्या प्रचंड गंमतीजमती आपल्याला दिसतील.