Khundalghas खूदळघास by Sadanand Deshmukh
Khundalghas खूदळघास by Sadanand Deshmukh
छोट्या गावातील कुटुंबातले संस्कार आणि ग्रामीण जीवनाचे अस्सल रंग ल्यालेले प्रगल्भ मन यांच्या आधारे सदानंद देशमुखांनी आपले सर्व लेखन केले. केवळ काल्पनिक आयुष्य उभे करण्यापेक्षा देशमुख आपल्या कथा कादंबर्यातून ग्रामीण प्रश्नांना आणि भोवतालच्या वास्तवाला थेट भिडताना दिसतात. अतिशय डोळसपणे, निर्भीडपणे, ताकदीने मांडलेले हे अनुभव खुंदळघास या कथासंग्रहात अधिकच जिवंत होतात. लहानपणापासून शेतीत राबताना, अनेक अडथळे पार करत शिक्षण पूर्ण करताना आणि त्यानंतर ग्रामीण भागातच वास्तव करून राहताना माणसांमधल्या अनेक वृत्ती प्रवृत्ती त्यांना अनुभवायला मिळाल्या, त्याच त्यांनी आपल्या लेखनामधून वाचकांपुढे मांडल्या.