Skip to product information
1 of 2

Payal Books

Khidkilahi Dole Astat By Dr. Bal Phondke

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
खून झाल्यानंतर तब्बल एका वर्षानंतर खुन्याला रंगेहात पकडता येईल?संगणकाद्वारे इमेलमधून मिळालेल्या संदेशाचा अर्थ दोन तास पस्तीस मिनिटांमध्ये लावून हजारो निरपराध नागरिकांचे जीव वाचवता येतील? बागेमध्ये झालेल्या खुनाच्या वेळी तिथं हजर असलेल्या चौघांवरही संशय असताना त्यांच्या व्यतिरिक्त कोणी चष्मदीद गवाह सापडू शकेल? सून जळाली तेव्हा आपण दुसरीकडेच होतो असा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून सादर केलेला सासयांच्या पुराव्याची सत्यासत्यता पडताळून पाहता येईल? हृदयविकाराचा झटका येऊन शेटजींचा मृत्यू झाला तो खरोखरच नैसर्गिक होता की घडवून आणला होता? संग्रहालयात ठेवलेली अडीच हजार वर्षांपूर्वीची अंगठी खरोखरच त्या काळातल्या शंभर नंबरी सोन्याची आहे हे ठामपणे सिद्ध करता येईल? आपलं घरटं सोडून कोंबडी का पळाली हे सांगता येईल? या आणि अशा मति गुंग करणाया सवालांनी बेचैन झालेले पोलिस कमिशनर अमृतराव मोहिते, जेव्हा त्यांचे मित्र असलेल्या वैज्ञानिक डॉक्टर कौशिकांकडे जातात; तेव्हा विज्ञानाच्या मदतीनं त्या दोघांना गुन्हेगारांना थांगपत्ता लावायला वेळ लागत नाह. कारण मग त्यांना, गुन्हेगारांना आणि इतरांनाही कळून चुकतं की विज्ञानाच्या नजरेतून बघितल्यावर लक्षात येईल, `खिडकीलाही डोळे असतात`. इंदिरा गांधी पुरस्कार, वीर सावरकर पुरस्कार, तसंच भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र साहित्य परिषद यासारख्या संस्थांचे पुरस्कार यांनी सन्मानित झालेल्या डॉक्टर बाळ फोंडके यांच्या ओघवत्या शैलीतील आगळ्यावेगळ्या रहस्यविज्ञानकथांचा हा ताजा संग्रह.